सुंदर दिसण्यासाठी खा मशरूम

सुंदर दिसण्यासाठी खा मशरूम

नेहमी तरूण व उत्साही राहायचे असेल तर आजपासून मशरूम खाणे सुरू करा. सूप, भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. मशरूम तुम्हाला दीर्घ काळासाठी तरूण व सुंदर बनवेल. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट वय वाढण्याची गती कमी करतात. एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अॅर्गोथिऑनिन व ग्लूटोथिऑन आढळते. हे दोन्ही अत्यावश्यक अँटीऑक्सिडंट आहेत. मशरूमच्या प्रकारानुसार त्यातील या अँटीऑक्सिडंटचे प्रमाण बदलते. अमेरिकेतील पेन्सिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रॉबर्ट बिलमॅन यांनी सांगितले, की मशरूम या दोन्ही अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत असून मशरूमच्या काही प्रकारांमध्ये दोन्ही एकत्र उपस्थित असतात.  जेव्हा उर्जानिर्मितीसाठी शरीर अन्नाचे ज्वलन करते, त्यावेळी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. शरीरात अँटीऑक्सिडंटची कमी पुन्हा भरून काढून या स्ट्रेसपासून सुटका मिळवता येते. हे संशोधन जर्नल फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.