या फायद्यांसाठी प्यायला हवे गरम पाणी

या फायद्यांसाठी प्यायला हवे गरम पाणी

पाण्याला जीवन म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा खजिना पाणी आहे. परंतु कोमट पाण्याचे फायदे साध्या पाण्यापेक्षा जास्त आहेत. कोमट पाणी आरोग्यासाठी औषधाप्रमाणे आहे. गरम पाणी औषधी गुणांची खाण आहे. पाणी गरम करून घेतले तर पोट साफ न होण्याच्या तक्रारीपासून सुटका मिळवता येते.

गरम पाण्याचे फायदे -
गरम पाण्याने अंघोळ केल्याने थकवा नाहीसा होतो. त्वचा उजळवण्यासाठी व त्वचेसंबंधी रोग दूर करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करणे उपयोगी मानले जाते.
दिवसभर मेहनत केल्यावर थकवा घालवण्यासाठी गरम पाणी फायद्याचे आहे.
दररोज कोमट पाणी पिल्याने अधिक ताजेपणा जाणवतो.
गरम पाण्याचा उपयोग वजन कमी करणे, रक्त प्रवाह सुरळीत करणे व रक्त प्रवाह संतुलित ठेवणायसाठी केला जातो.
गरम पाण्यासोबत लिंबू व मध घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करण्यसाठीही हा उपाय गुणकारी आहे.
श्वसनासंबंधित रोग असल्यास थंड पाणी पिऊ नये.
गरम पाणी हाडे व स्नायूंच्या दुखण्यासाठीही आवश्यक आहे. कोमट पाण्याने स्नायूबंधांमधील घर्षण कमी होण्यास मदत होते. यामुळे भविष्यात संधीवात होण्याची शक्यता कमी होते.