हिवाळ्यात तूप खुलवेल तुमचे रूप

हिवाळ्यात तूप खुलवेल तुमचे रूप

तुपाचे अनेक फायदे आहेत. यामुळे निरोगी आरोग्याबरोबरच सौंदर्यही खुलते. अनेकजण तूप पसंत नसल्याने किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन करत नाहीत. मात्र प्रमाणात खाल्लेल्या तुपामुळे लठ्ठपणा किंवा हृदयविकारांचा धोका होत नाही असे अनेक प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे. तुपामुळे आरोग्य निरोगी राहून, वजन नियंत्रणात ठेवले जाते. तसेच सौंदर्यही उजळते.

हिवाळ्यात तूप खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच खालील फायदे होतील : 

नॅचरल मॉश्चराईजर -  जर तुमची त्वचा कोरडी असेल तर कोणत्याही महागड्या क्रीमपेक्षा तूप वापरणे नक्कीच फायद्याचे आहे. अंघोळीच्या अगोदर तूप थोडे गरम करुन घ्या आणि पूर्ण शरीराला मसाज करा. अंघोळीनंतर लगेचच आपल्याला कोमल त्वचेची अनुभूती मिळेल.

फुटलेल्या ओठांसाठी -  लिप बाम वापरणे फायदेशीर असते हे तुम्हाला  माहीत आहे. पण जेव्हा फुटलेल्या ओठांसाठी सगळे उपाय निरुपयोगी ठरतात तेव्हा तुपाचा वापर करा. याच्या हिलींग क्वॉलिटीमुळे तात्काळ आराम मिळेल.

डार्क सर्कलपासून सुटका - झोप पूर्ण न होण्याच्या समस्येमुळे डार्क सर्कल येतात. झोपण्यापूर्वी डार्क सर्कलवर तूप लावा. सकाळी धुवून घ्या. हळूहळू डार्क सर्कलची समस्या कमी होईल.

नॅचरल ग्लो -  तूप हे दुधापासून तयार होते. यामुळे त्यात मिनरल्स आणि कॅल्शिअम असतात. जेव्हा तुम्ही हे त्वचेवर लावता तेव्हा मॉश्चराईजरसोबत मिनरल्सही त्वचेत सामावले जातात. यासाठी अजून एक खास उपाय आहे, तो म्हणजे चिमुटभर हळद तुपात मिसळा आणि चेहऱ्यावर लावून २० मिनिटांनी धुवा.