अशाप्रकारे आपली योगा मॅट ठेवा जर्म फ्री

अशाप्रकारे आपली योगा मॅट ठेवा जर्म फ्री

स्वच्छ घरामुळे घरातील वातावरण आनंदी राहते. आपण घर स्वच्छ करतो. परंतु दररोज वापरल्या जाणाऱ्या लहान-सहान वस्तूंच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने त्या वस्तू किटाणूग्रस्त होतात. अशाच दुर्लक्षित वस्तूंमध्ये तुमच्या योगा मॅटचाही समावेश होतो. उत्तम आरोग्यासाठी दररोज ज्या मॅटवर बसून योग केला जातो, तीच मॅट आजाराचे कारण ठरू शकते. मॅटला सहज स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरीच स्प्रे तयार करू शकता. हा स्प्रे वापरून तुम्ही तुमच्या योगा मॅटला स्वच्छ करू शकता. 

 

अशाप्रकारे वापरा : 

१. पाण्यात तेल आणि व्हिनेगर मिसळून एकत्र करा.

२. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्या. 

३. मॅटवर हे पाणी शिंपडून जाड कापडाने घासून स्वच्छ करा.
 
४. सुकल्यानंतर तुमची मॅट स्वच्छ झालेली दिसेल.