अशाप्रकारे ताण घेणे ठरू शकते तुमच्यासाठी घातक

अशाप्रकारे ताण घेणे ठरू शकते तुमच्यासाठी घातक

जर तुम्ही तणावपूर्ण स्थितीचा सामना करत आहात तर अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पुनर्विचार करा. तणावपूर्ण स्थितीत घेतलेले निर्णय घातक ठरू शकतात. एका संशोधनात असे आढळले आहे, की तणावपूर्ण बुद्धीचा परिणाम तुमच्या निर्णयक्षमतेवर होतो. अशा स्थितीत घेतलेल्या निर्णयांचा परिणाम तुम्हाला होणाऱ्या फायद्यांवर होतो. जर्नल सेलमध्ये प्रकाशित एका संशोधनात अभ्यासात सांगितले आहे की, बुद्धीच्या एका विशिष्ट सर्किटच्या विकारांमुळे निर्णयक्षमतेवर प्रभाव पडतो. परंतु या सर्किटमध्ये अदलाबदल केल्यास व्यक्ती पुन्हा सामान्य मनस्थितीत परत येऊ शकते. माणसाच्या मेंदूतील सर्किट बदलण्याची पद्धत शोधून काढता आल्यास डिप्रेशन, व्यसन, चिंता अशा मानसिक त्रासांपासून सुटका मिळू शकते. हे मानसिक आजार कोणत्याही व्यक्तीच्या निर्णयक्षमतेला प्रभावित करतात. कॅम्ब्रिज विद्यापीठातील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक एन ग्रेबियेल यांनी सांगितले, 'आम्हाला स्ट्रायटममध्ये न्यूरॉन्सचे एक मायक्रोसर्किट आढळले. यामुळे आपण धोक्याचे निर्णय घेताना निर्माण होणाऱ्या तणावाचा परिणाम बदलू शकतो.' संशोधकांचे मत आहे की, हे सर्किट संभाव्य पर्यायांच्या चांगल्या व वाईट परिणामांच्या माहितीला एकत्र करते व मेंदूला निर्णय घेण्यास मदत करते.'