जास्तीचा व्यायाम ठरतोय घातक

जास्तीचा व्यायाम ठरतोय घातक

नाशिक : स्वतःच्या फिटनेसबाबत स्त्रिया सध्या चांगल्याच जागरूक झाल्या आहेत; पण अति व्यायाम आणि डाएटिंगचे वेडेवाकडे प्रकार स्त्रियांचं हार्मोनल संतुलन बिघडवत असून, त्याचा परिणाम थेट त्यांच्या गर्भ धारण करण्याच्या क्षमतेवर होत आहे.

ज्या स्त्रिया जिममध्ये दीड ते दोन तास सलग व्यायाम करतात आणि आहाराची पथ्यंही पाळतात (डाएट) त्यांच्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन दोन ते तीन महिन्यांतच बिघडू लागतं. त्याचा परिणाम त्यांच्या गर्भधारण करण्याच्या क्षमतेवर होत असल्याचं नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे.

हार्मोन्सचा हा तोल एकदा बिघडला, की तो पूर्ववत करणंही अवघड असतं. अशा वेळी औषधं आणि सुयोग्य डाएट करूनच हा हार्मोन्सचा बिघडलेला तोल पुन्हा पूर्ववत होऊ शकतो.