राक्षसी अल्लाउद्दीन खिल्जी अखेर दिसला

राक्षसी अल्लाउद्दीन खिल्जी अखेर दिसला

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीमधल्या अल्लाउद्दीन खिल्जीचा लूक आज रीवील झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा लूक ट्विटरवर पडला. राक्षसी महत्वाकाक्षेची झलक डोळ्यात दिसणारा अल्लाउद्दीन पाहून या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढते. रणवीर सिंगने वठवलेली ही व्यक्तिरेखा पाहाणं हे चित्रपट रसिकांसाठी पर्वणी असेल.

पद्मावती या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी दीपिका पदुकोन, शाहीद कपूर यांचे लूक सिनरसिकांनी पाहिले आहेत. आता रणवीरच्या लूकची चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर आहे. लांब केस, वाढलेली दाढी, भुरे डोळे आण काजळ घातलेले डोळे अशा लूकमध्ये रणवीर सिंग सोशल मीडीयावर अवतरला. अत्यंत ताकदवान अल्लाउद्दीन खिल्जीला पडद्यावर झळवण्यासाठी रणवीरने आपल्या व्यायामातही वाढ केली होती. शिवाय माध्यमांपासून तो दूर होता. काही दृश्यांसाठी त्याने विशेष अत्तराचा वापरही केला होता. खास तुर्कीहून हे अत्तर मागवण्यात आलं होतं. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.