सलमान खानविरोधात गुन्हा दाखल

सलमान खानविरोधात गुन्हा दाखल

'बिग बॉस'च्या सेटवर स्पर्धक जुबेर खानला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईबीसी कंपनीच्या कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस सीजन-११ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला जुबेर अली खान (वय- ३०) याला बिग बॉसच्या सेटवर 'तुझे कुत्ता बनाउंगा, तू बाहर निकल, तेरे को छोडूंगा नही' असे म्हणत दमदाटी करण्यात आली होती. याप्रकरणी जुबेर खानने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी सलमान खान आणि कलर्स वहिनी विरोधात भा.द.वी. कलम ५०६, ३४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.