‘पद्मावती’चा ट्रेलर पाहून अमिताभ भारावले!

‘पद्मावती’चा ट्रेलर पाहून अमिताभ भारावले!

मुंबई : डोळे दिपवणारे भव्यदिव्य सेट्स, अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील भयावह रणवीर सिंग आणि काळजाला भिडणारे संवाद... या सगळ्याचा सुंदर मिलाप असलेल्या 'पद्मावती'च्या ट्रेलरनं सध्या चित्रपटरसिकांवर गारुड केलं आहे. 'पद्मावती'च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही 'पद्मावती'च्या ट्रेलरचं आणि संजय लीला भन्साळींच्या कलागुणांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

'पद्मावती'चा ट्रेलर पाहून भारावलेल्या अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे. 'त्याला हे कसं काय जमतं?... संजय लीला भन्साळी. पद्मावती आणि ट्रेलर! या माणसाला विलक्षण दृष्टी लाभलीय. वरदानच मिळालंय.' असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.