‘पद्मावती’चा ट्रेलर लाँच

‘पद्मावती’चा ट्रेलर लाँच

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'पद्मावती' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. रणवीर सिंह, दीपिका पदूकोण आणि शाहीद कपूर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. महाराणी 'पद्मावती' यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून 'पद्मावती'ची भूमिका दीपिका पदूकोणने साकारली आहे. शाहीद कपूर राजा रतन सिंहच्या भूमिकेत असून रणवीर सिंहनं अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारली आहे.हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दीपिका, रणवीर आणि शाहीद कपूर हे तिघेही आपापल्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहेत. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये केवळ दीपिकाचा एक डॉयलॉग आहे. त्यात ती म्हणतेय, 'राजपुती कंगन मे उतनी ही ताकत है, जितनी राजपुती तलवार मे'