पद्मावतीतील ‘एक दिल है..’ गीत रीलिज

पद्मावतीतील ‘एक दिल है..’ गीत रीलिज

दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘एक दिल है.. एक जान है’ या गाण्यातून राणी पद्मावती आणि राजा रतन सिंह यांच्यातील अलवार नातं उलगडताना दिसत आहे. ‘घुमर’नंतर ‘पद्मावती’ चित्रपटातलं हे दुसरं गाणं रीलिज झालं आहे. ‘एक दिल है.. एक जान है, दोनो तुझपे कुर्बान है’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातूनही भन्साळींनी प्रेक्षकांना व्हिज्युअल ट्रीट दिली आहे.ए एम तुराझ यांनी ‘एक दिल है..’ गाणं लिहिलं असून स्वतः संजय लीला भन्साळींनीच संगीतबद्ध केलं आहे. शिवम पाठकने हे तरल गाणं गायलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.