गांधी हत्येवर आधारित वेब सिरिज

गांधी हत्येवर आधारित वेब सिरिज

फरारी की सवारी' चित्रपटातून हिंदी तर 'व्हेंटिलेटर' चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर माळगावकर लिखित 'दि मेन हू किल्ड गांधी' या पुस्तकात उल्लेखलेल्या घटना आणि गांधींच्या हत्येवेळी भारतातील परिस्थिती यांचं चित्रण असणार आहे. याविषयी बोलताना 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुराही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे.