मीना कुमारींचा बायोपीकमध्ये विद्याने नाकारला

मीना कुमारींचा बायोपीकमध्ये विद्याने नाकारला

विद्या बालननं दर्जेदार आणि निरनिराळ्या भूमिका साकारून वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. विद्याच्या भूमिका आणि चित्रपटाविषयी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. विद्याला अलिकडेच अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात काम करण्याची ऑफर होती आणि तिने चक्क या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. विद्याच्या या निर्णयाने तिचे चाहते नाराज होण्याची शक्यता आहे. खरं तर विद्याला जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं तेव्हा ती या चित्रपटात काम करायला मिळणार म्हणून खुप खूष होती. पण अचानक तिने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. आता विद्याच्या जागी या बायोपिकमध्ये कंगनाची वर्णी लागल्याचे समजते आहे.