ह्रतिक रोशनचे विद्यार्थी होण्यासाठी १५ हजार कलाकारांनी दिली ऑडिशन

ह्रतिक रोशनचे विद्यार्थी होण्यासाठी १५ हजार कलाकारांनी दिली ऑडिशन

मुंबई - ‘सुपर ३०’ हा ह्रतिक रोशनचा आगामी चित्रपटाची निर्मिती लवकरच होणार आहे. या चित्रपटात आयआयटी कोचिंग क्लासचा समर्पित शिक्षक ह्रतिक साकारणार आहे. पाटणा येथील यशस्वी कोच आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यासाठी ३० विद्यार्थ्यांची भूमिका करणारे कलाकार हवे आहेत. यासाठी तब्बल १५,००० तरुणांनी ऑडिशन दिली आहे. चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा त्या ३० जणांच्या शोधासाठी जीवाचे रान करीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश, बिहार, मुंबई आणि दिल्लीत यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली. १५ हजार तरुणांमधून ७८ कलाकारांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून यांचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. यातून गुणवंत ३० कलाकारांची निवड केली जाणार आहे. या सर्वांना ह्रतिक रोशनसोबत अभिनय करण्याची संधी मिळणार आहे.शूटींगला सुरूवात करण्यापूर्वी या ३० कलाकारांचे स्वतः ह्रतिक वर्कशॉप घेणार आहे. विकास बहल दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटाचे वर्किंग टायटल ‘सुपर ३०’ असे ठेवण्यात आले आहे.