बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेख पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर

बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेख पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर

बॉलिवूडची 'धाकड गर्ल' फातिमा सना शेख पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर आलीय. फातिमानं साडीतील एक सेल्फी ​ नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि नेटिझन्सनी तिला 'ट्रोल' करायला सुरुवात केली. यापूर्वीही तिच्या साडीतील फोटोला 'शेमलेस सेल्फी' ठरवत असंच ट्रोल करण्यात आलं होतं. फातिमानं लाल रंगाच्या साडीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. प्रसिद्ध फोटोग्राफर अर्जुन कामथसोबत केलेल्या फोटोशूटमधील हा एक फोटो असून तिनं नेसलेल्या साडीच्या पद्धतीमुळं ती टीकेची लक्ष्य बनलीय. 'एका महिलेनं असं अंगप्रदर्शन करू नये' , 'तुझ्या मर्यादा तुला माहीत असल्या पाहिजेत' असं म्हणत काहींनी तिला उपदेशांचे डोस पाजलेत. तर 'तू मुस्लिम असून हिंदूंचा पोषाख असलेली साडी कशी नेसू शकतेस' असा अजब सवालही काही मंडळींनी विचारलाय.