‘पद्मावती’ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका

‘पद्मावती’ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत पद्मावती सिनेमाच्या समर्थनार्थ, खुद्द पद्मावती अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण मैदानात उतरली आहे. पद्मावती सिनेमा प्रदर्शित होणारच आणि त्याला कुणीही थांबवू शकत नाही, असं सिनेमात पद्मावती साकारणाऱ्या दीपिका पदुकोणने म्हटलं आहे. “सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत”, असं दीपिकाने म्हटलं आहे. एक महिला म्हणून या सिनेमाचा भाग असणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, या सिनेमाची कहाणी सांगणं हे आवश्यक आहे, असंही दीपिका म्हणाली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्सालींना मारहाणही करण्यात आली होती.