‘डॅडी’ च्या गँगचा ‘ छुपा चेहरा ’ विजय

 ‘डॅडी’ च्या गँगचा ‘ छुपा चेहरा ’ विजय

मुंबई : आजच्या घडीला अर्जुंन रामपाल  अभिनित आणि असीम अहलुवालिया दिग्दर्शित ‘डॅडी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या जीवनावर आधारित ‘ डॅडी ’ चित्रपट येणार आहे.  अरुण गवळीच्या काळात B.R.A ही गँग कुख्यात गँग म्हणून ओळखली जात होती. हि गँग बाबू रेशीम, रमा नाईक, आणि अरुण गवळी या तिघांनी बनवली होती. पण, ह्या गँग मध्ये अजून एक छुपा चेहरा होता तो म्हणजे ‘विजय’. या चित्रपटात विजयची भूमिका साकार्तांना मराठमोळा अभिनेता पूर्णानंद दिसेल.

‘ तुकाराम ’, ‘ फँड्री ’, ‘ आजचा दिवस माझा ’ अश्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनेता पूर्णानंद याने आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. ‘डॅडी’ या चित्रपटामध्ये अर्जुन रामपालसोबत पूर्णानंद अभिनय करतांना दिसणार आहे. B.R.A गँगमधील ‘छुपा चेहरा’ म्हणजेच चौथा व्यक्ती असलेल्या विजयच्या भूमिकेत आपल्याला पूर्णानंद दिसेल.