‘बाहुबली 2’ चं नवं पोस्टर रिलीज

 ‘बाहुबली 2’ चं नवं पोस्टर रिलीज

 दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये कटप्पाने बाहुबलीला त्याच्या हातामध्ये घेतलेलं दिसत आहे, तर दुसरीकडे बाहुबली कटप्पाला मारताना दिसत आहे.‘ज्या मुलाला त्याने वाढवलं, त्याच मुलाला त्याने मारलं,’या कॅप्शनसह राजामौली यांनी पोस्टर शेअर केलं आहे. 

आमच्या डिझायनरला ही कल्पना सुचली आणि ट्वीट करण्याचा मोह आवरला नाही, असंही राजामौली यांनी म्हटलं आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्या बाहुबली या सिनेमाचा ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’ हा सिक्वेल सिनेमा आहे. यावर्षी 28 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सिक्वेलमधून मिळणार आहे. पण या पोस्टरमध्ये कटप्पा बाहुबलीला पुन्हा एकदा मारताना दिसत आहे, त्यामुळे या प्रश्नाचं कोडं सोडवण्याची प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार आहे.