‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ने चाहत्यांना केलंय घायाळ

 ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ने चाहत्यांना केलंय घायाळ

'अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर' या हॉलिवूडपटाने भारतीय रसिकांना वेडावून सोडलंय. हा चित्रपट २७ एप्रिल रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटाची कमाई ९४ करोड इतकी झाली असून त्याने पहिल्याच आठवड्यात 'पद्मावत' (७५ करोड) आणि 'बागी-२' (७२.५० करोड) ह्या चित्रपटांचा रेकॉर्ड देखील तोडला आहे. 

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार हा चित्रपट वीकेंडला प्रदर्शित झाला असता तर त्याने १०० करोडचा आकडा पहिल्याच दिवशी पार केला असता. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचीच कमाई ३१ करोड रुपये इतकी झाली. आतापर्यंत वीकेंडला जबरदस्त कमाई केलेल्या चित्रपटांमध्ये 'टाइगर जिंदा है', 'सुलतान', 'दंगल', 'धूम-३' या चित्रपटांचा समावेश होतो. या चित्रपटाने 
पहिल्याच वीकेंडला म्हणजेच शुक्रवारी ३१ कोटी ३३ लाख रुपये, तर शनिवारी ३० कोटी २५ लाखांची कमाई केली. तसेच चित्रपटाने रविवारी ३२ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची वीकेंडला एकूण कमाई होती ९४.३३ कोटी रुपये. 

सध्या 'अॅव्हेंजर्स' सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. तिकिटाचे दर कितीही महाग असले तरी देखील प्रेक्षक ह्या चित्रपटाला पसंती देत आहेत.