वादळवारे वाहत असतानाही ऐश्वर्याचं शूटिंग

वादळवारे वाहत असतानाही ऐश्वर्याचं शूटिंग

गेल्या आठवड्यात ओखी चक्रीवादळाने केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप भागात थैमान घातले होते. ओखीमुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, हे वादळ ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांचा दृढ निश्चयाला मोडू शकले नाही. या तीनही कलाकारांनी वादळाची पर्वा न करता आगामी 'फन्ने खान' चित्रपटाचे चित्रीकरण सुरूच ठेवले.ओखी वादळ धडकणार म्हणून मुंबई आणि आसपासच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी हे कलाकार भांडुपमधील एका स्टुडिओत काम करत होते. चक्रीवादळाचे वृत्त समजल्यावरही घरी न जाता तब्बल १२ तास ही मंडळी स्टुडिओत काम करत राहिली. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत सर्व कलाकार स्टुडिओत चित्रीकरणात व्यग्र होते. अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून राकेश ओमप्रकाश मेहरा आणि प्रेरणा अरोरा चित्रपटाचे निर्माते आहेत. ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेल्या ‘एवरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा ‘फन्ने खान’ हा रिमेक आहे.