म्हणून जोडप्यांमध्ये असायला हवे वयाचे अंतर

म्हणून जोडप्यांमध्ये असायला हवे वयाचे अंतर

लग्न करण्यापूर्वी मुलाच्या व मुलीच्या बाजूने अनेक गोष्टींचा विचार केला जातो. समोरच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, शिक्षण, स्वभाव या सर्व गोष्टी पडताळून बघितल्या जातात. यासोबतच लग्न जुळवताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली जाते, ती म्हणजे मुलगा व मुलीचे वय. पूर्वी मुलगा व मुलीच्या वयात १० ते १५ वर्षांचा फरक असला तरी चालत असे. आता मात्र मुलामुलींच्या वयात एवढा अधिक फरक आढळत नसला तरी मुलाचे वय मुलीपेक्षा अधिक असायला हवे, असा प्रयत्न असतो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तरी असे आढळते की, बहुतांश जोडप्यांमध्ये मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असतो. मुलगा व मुलगी यांचे नाते आणि वय यांचा परस्पर संबंध आहे का ? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच होकारार्थी आहे. वयाचा मोठा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. मुलांच्या तुलनेत मुली मानसिकरित्या लवकर परिपक्व होतात. समवयीन मुलगा व मुलगी यांच्या स्वभावाचे आकललन केल्यास मुलगी मुलापेक्षा वैचारिक व भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व असल्याचे आढळते. अर्थात याला अपवादही असू शकतात.