जाहिरातीत एकत्र झळकणार अमिताभ आणि जया बच्चन

जाहिरातीत एकत्र झळकणार अमिताभ आणि जया बच्चन

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी रियल लाईफ आणि रील लाईफमध्ये नेहमीच हिट राहिली आहे. लवकरच दोघे एका जाहिरातीसाठी पुन्हा काम करणार आहेत. अमिताभने जय बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'एका ज्वेलरीच्या जाहिरातीसाठी पत्नीसोबत काम करीत आहे. सावधान ! पत्नीसोबत शूटींग...!!', असे त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अमिताभने जय बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'एका ज्वेलरीच्या जाहिरातीसाठी पत्नीसोबत काम करीत आहे. सावधान ! पत्नीसोबत शूटींग...!!', असे त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोत दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. अलिकडेच 'की अँड का' चित्रपटात ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसली होती. यात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होता.