‘हॅपी बर्थडे पा’... अभिषेकच्या हटके शुभेच्छा

‘हॅपी बर्थडे पा’... अभिषेकच्या हटके शुभेच्छा

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ७५वा वाढदिवस कालच साजरा झाला. आपल्या लाडक्या बीग बींवर यावेळी चाहत्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून अनोख्या प्रकारे शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, नेहमीच्या झगमगाटापासून दूर जात शहंशाहाने आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत मालदीवमध्ये साजरा केला. बीग बींच्या पंचाहत्तरीचा सोहळा नेमका कसा झाला असेल याविषयी सर्वांनाच कुतूहल होतं. अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी अभिषेक बच्चननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या सेलेब्रेशनची पोस्ट टाकली आहे.

अभिषेकनं पोस्ट केलेला हा फोटो एका प्राइव्हेट बीचवरचा असून यात पाठमोरे अमिताभ दिसत आहेत. त्यांच्यासमोर वाळूत एका बोर्डवर आगीत झगमगत हॅपी बर्थ-डे असे लिहिले आहे. अवघ्या काही क्षणांतच हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.