‘साडी नेसता येत नाही याची महिलांना लाज वाटली पाहिजे’

‘साडी नेसता येत नाही याची महिलांना लाज वाटली पाहिजे’

मुंबई - हावर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये सेलिब्रिटींचा फेवरेट फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी नव्या पिढीच्या महिलांवर केली आहे. साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे असे ते म्हटले आहे. या विधानावरुन अनेक महिला नाराज झाल्या आहेत. सब्यसाची मुखर्जी हे भारतातील सर्वात आघाडिचे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. साडी हा सर्वात सुंदर पोशाख आहे. नव्या पिढीच्या महिलांना साडी नेसता येत यावरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

ते म्हणाले, ‘जर एखाद्या महिलेनं मला येऊन सांगितलं की मला साडी नेसता येत नाही तर मी त्याक्षणी तिला म्हणेल की तूला हे सांगायला लाज वाटायला पाहिजे. साडी हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे त्यामुळे प्रत्येक महिलेनं साडीला महत्त्व दिलंच पाहिजे.’ 

सब्यसाचीने दीपिकाचे उदाहरण देत म्हणाले, दीपिका ज्या कार्यक्रमाला जाते तिथे ती साडीच नेसूनच जाते. अनेक विदेशी लोकदेखील साडीचे कौतुक करतात. अनुष्का-विराटच्या लग्नात सब्यसाचीने दोघांचे आऊटफिट डिझाइन केले होते आणि याची चर्चा फॅशनविश्वात चांगलीच रंगली होती.