स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ मध्ये राजकुमार रावने पटकावले २ पुरस्कार

स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ मध्ये राजकुमार रावने पटकावले २ पुरस्कार

राजकुमारने या वर्षाची सुरुवातच दणक्यात केली आणि शेवटही गोड झालाय. विक्रमादित्य मोटवानेच्या 'ट्रॅप्प्ड' या चित्रपटाने व्यावसायिक यश फारसं मिळवलं नसलं तरी त्यातील राजकुमार रावच्या अभिनयाची प्रचंड स्तुती झाली. त्यानंतर त्याच्या प्रदर्शित झालेल्या 'बरेली की बर्फी' ने सर्वांचंच तोंड गोड केलं. समीक्षकांनी मुक्त कंठाने प्रशंसा तर केलीच पण चित्रपटाला व्यावसायिक यश मिळून तो हीट ठरला. चित्रपटातील राजकुमारच्या भूमिकेतील विनोदी अंगाचंही खूप कौतुक झालं. २०१७ च्या शेवटच्या टप्प्यात अमित मसुरकर दिग्दर्शित प्रदर्शित झालेल्या 'न्यूटन ने त्याच्या यशाच्या शिखरावर मुकुट चढविला. 'न्यूटन'ची ऑस्करसाठी भारतातर्फे अधिकृतपणे निवड झाली. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'शादी में जरूर आना'ला सुद्धा समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.नुकत्याच संपन्न झालेल्या स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ मध्ये राजकुमार रावने २ पुरस्कार पटकावले. 'न्यूटन' मधील भूमिकेसाठी त्याला 'क्रिटिक्स चॉईस बेस्ट ऍक्टर' प्रदान करण्यात आला तर 'बरेली की बर्फी'मधील त्याच्या अदाकारीसाठी राजकुमाराला 'बेस्ट सपोर्टींग अॅक्टर'चा पुरस्कार देण्यात आला. या द्विगुणित आनंदाबद्दल बोलताना राजकुमार तन्मयतेने म्हणाला 'मी 'न्यूटन'चे दिग्दर्शक अमित मसुरकर आणि निर्माते आनंद एल राय व मनीष मुंद्रा याचे मनःपूर्वक आभार मानतो. हे सर्व खंबीर असल्याकारणाने हे दोन्ही चित्रपट बनू शकले. मी खासकरून प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो कारण त्यांनी 'न्यूटन' सारख्या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला. मी त्यांना ग्वाही देऊ इच्छितो की, तुम्ही असाच पाठिंबा देत राहिलात तर अजून १० 'न्यूटन' आम्ही तुम्हाला देऊ!' राजकुमार रावला नुकतंच अजून एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तो म्हणजे आशियातील सर्वोच्च सन्मान असलेला 'आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड'.