रेणुका शहाणेचा नवीन लूक

रेणुका शहाणेचा नवीन लूक

'हम आपके है कौन' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेचा नवीन लूक पाहाल तर चक्रावून जाल. खरंच ही रेणुका शहाणे का? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या '३ स्टोरीज' चित्रपटासाठी रेणुका शहाणेने हा लूक बनवला असून तिची या चित्रपटातील भूमिका नक्कीच हटके असणार याची चाहुलच हा लूकमधून लागते. ३ स्टोरीज' चित्रपटाचे पहिले पोस्टर झळकले असून यात रेणुका शहाणे गोवन लूकमध्ये दिसत आहे. रेणुकाचा हा लूक बराच लक्ष्यवेधी असून तिच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता यानिमित्ताने अधिक ताणली गेली आहे. ३ स्टोरीज चित्रपटात शर्मन जोशी, पुलकित सम्राट, रिचा चड्ढा, रेणुका शहाणे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता फरहान अख्तरही निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.