अब्बास - मस्तान ऐवजी ‘रेस ३’ चे दिग्दर्शन करणार रेमो डिसुझा

अब्बास - मस्तान ऐवजी ‘रेस ३’ चे दिग्दर्शन करणार रेमो डिसुझा

मुंबई - 'रेस' या गाजलेल्या चित्रपटाचे २ भाग आजपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले होते. बॉलिवूडची प्रसिध्द दिग्दर्शक जोडी अब्बास - मस्तान यांनी हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. मात्र आता 'रेस ३' हा चित्रपट येत असून याचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहे.''अब्बास - मस्तान हे चांगले दिग्दर्शक आहेत आणि मी त्यांचे चित्रपट पाहिले आहेत. ते त्यांच्या क्षेत्रातील मास्टर आहेत. मी 'रेस ३' करीत असताना त्यांच्या इतका करु शकणार नाही. कारण त्यांचे अगोदरचे काम खूप वेगळे आहे, परंतु मला ही संधी मिळतेय याचा आनंद आहे. त्यांना अभिमान वाटावे असे काम मी करेन अशी आशा आहे,'' असे रेमो म्हणाला. सलमान खान 'रेस ३' मध्ये काम करणार असल्यामुळे रेस सिरीज मोठी गोष्ट ठरणार आहे. ''सुपरस्टार किंवा एखादा मोठा स्टार फ्रँचीसमध्ये येतो तेव्हा ती फ्रँचीस मोठी होत असते. अर्थात सलमान खान सहभागी होत असल्यामुळे 'रेस ३' निश्चितपणे पुढे जाईल,'' असे रेमोला वाटते. सैफ अली खान रेसच्या पहिल्या दोन्ही भागात होता. परंतु 'रेस ३' मध्ये संपूर्ण नवीन टिम आहे. यात बॉबी देओल, सूरज पांचोली, सकिब सलीम आणि डेजी शाह यांच्या भूमिका आहेत. जॅकलिन फर्नांडिस 'रेस २' मध्ये होती.बॉबी देओलचा 'रेस ३' मध्ये वेगळा अवतार पाहायला मिळणार असल्याचे रेमो डिसुझाने सांगितले. 'रेस ३' चे शूटींग अबू धाबी आणि मुंबईत पार पडणार आहे. निर्माता रमेश तुराणी यांनी हा चित्रपट २०१८ च्या ईदला 'रेस ३' प्रदर्शित होणार असल्याचे जाहिर केले आहे.