सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष : प्रसून जोशी

सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष : प्रसून जोशी

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ अर्थातच सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष म्हणून गीतकार पासून जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. या आधी ह्या अध्यक्ष पदाचा कार्यभार पहलाज निजलानी यांच्याकडे होता. सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या समितीत अभिनेत्री विद्या बालन यांनाही स्थान देण्यात आलेले आहे. पहलाज निजलानी यांची २०१५ साली नियुक्ती करण्यात आलेली होती.गेल्या आठवड्यात चित्रपट दिग्दर्शकांनी एकत्र येऊन त्यांच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे ठरविले. आणि त्या अंतर्गत प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.