माझ्या काळातही मंत्रालय बळजबरीने निर्णय घेत होते  : पहलाज निहलानी

माझ्या काळातही मंत्रालय बळजबरीने निर्णय घेत होते  : पहलाज निहलानी

मुंबई - सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहण्याच्या अगोदर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संजय लीला भन्साळी यांना 'पद्मावती'बद्दल विचारणा केल्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे सेन्सॉरचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी म्हटले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्यावरही असाच दबाव टाकून काम केल्याचे त्यांनी सांगितले. ''संसदीय समितीला भन्साळी यांना अगर कोणत्याही दिग्दर्शकाला बोलवून प्रश्न विचारण्याचा सर्वार्थाने अधिकार आहे. परंतु केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहून सर्टिफिकेट दिल्यानंतरच.''सेन्सॉर सर्टिफिकेट नसताना त्यांना प्रश्न विचारणे म्हणजे केंद्रीय सेन्सॉर बोर्डाला आव्हान देण्यासारखे आहे. माझ्या काळातदेखील माहिती आणि प्रसारण मंत्रालय बळजबरी करीत निर्णय घेत होते.'', असे निहलानी म्हणाले.''आता सर्वांसाठी रान मोकळे झाले आहे. कोणतीही सरकारी समिती आता चित्रपटाबद्दल प्रश्न विचारणार. मग केंद्रीय सेन्सॉर बोर्डाकडे काय काम उरले ?'',असेही पहलाज निहलानी म्हणाले.'पद्मावती' चित्रपटाचा जो छळ सुरू आहे याबद्दल भीती व्यक्त करताना निहलानी म्हणातात, ''किती समित्यांना भन्साळी यांनी उत्तरे द्यायची आहेत ? आणि हे कधी थांबणार ?''''भारताच्या सर्वात चांगल्या दिग्दर्शकावर पुन्हःपुन्हा उत्तरे देण्याची वेळ का येते ? सेन्सॉर बोर्ड याबद्दल पाऊले उचलून मार्ग का काढत नाही,'' असे निहलानी म्हणाले.