अनुष्का आणि वरुण धवनच्या ‘सुई धागा’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

अनुष्का आणि वरुण धवनच्या ‘सुई धागा’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवनचा आगामी चित्रपट 'सुई धागा'चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. त्याआधी अनुष्काने सर्वांच्या अंगावर काटा आणणारा असा तिचा ‘परी’ चित्रपटातील भीतीदायक लूक प्रदर्शित केला. 'सुई धागा' या चित्रपटात वरुण आणि अनुष्का सर्व सामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘सुई धागा’चा फर्स्ट लूक अनुष्का आणि वरुण धवन आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर शेअर केला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत वरुणने लिहिले की, ‘EXCLUSIVE-मौजी और ममता से मिलिए २८ सितम्बर को.’