कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेखमध्ये ‘कॅट फाईट’

कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेखमध्ये ‘कॅट फाईट’

मुंबई - अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या 'ठग्ज ऑफ हिंदूस्थान' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असते. या चित्रपटाबद्दल ती थोडी नाराज असल्याचे समजते. याचे कारण आहे तिची सहकलाकार फातिमा सना शेख. कॅटरिना आणि फातिमा सना शेख यांच्या कॅट फाईट सुरू आहे. दोघी एकमेकांशी सेटवर बोलतदेखील नाहीत. या चित्रपटात कॅटरिना एका नव्या अवतारात दिसणार आहे. कॅटरिनाचा रोल छोटा असला तरी दमदार आहे. यासाठी ती खूप मेहनतही करीत आहे.कॅटरिनाच्या या भूमिकेमुळे फातिमा सना शेख असुरक्षित झाली आहे. चित्रपटात तिचा रोल कॅटरिनापेक्षा मोठा असला तरीही ती स्वतःला असुरक्षित समजत आहे.आमिर खान नेहमीच सेटवर फातिमा सना शेखची जास्त काळजी घेत असतो. तिचा चित्रपटातील रोल मोठा आहे. त्यामुळे कॅटरिना नाराज असल्याचे सूत्रांकडून समजते.