२५ वर्षाच्या कारकिर्दित एकदाही शूटींगला मारली नाही दांडी

२५ वर्षाच्या कारकिर्दित एकदाही शूटींगला मारली नाही दांडी

मुंबई - आजारपणाचे कारण देत कधीच शूटींगला दांडी मारली नाही. कारण यामुळे दुसरे कोणाचेतरी लाखो रुपयांचे नुकसान होत असते, असे अभिनेत्री काजोल हिने म्हटले आहे. ' दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', ' कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' यासारख्या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर राज्य केलेली अभिनेत्री काजोल गेली २५ वर्षे इंडस्ट्रीत काम करीत आहे. या दीर्घ कारकिर्दित तिने एकदाही तब्येतीच्या कारणावरुन शूटींग रद्द केलेले नाही. आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असल्याचे ती मानते. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला.