‘हेट स्टोरी ४’ ची पहिल्या वीकएंडला साडेबारा कोटीची कमाई!

‘हेट स्टोरी ४’ ची पहिल्या वीकएंडला साडेबारा कोटीची कमाई!

लव, सेक्स आणि धोका या थीमवर आधारित 'हेट स्टोरी ४' प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री उर्वशी रौतेला, करण वाही आणि विवान भाटेना प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता होती आणि प्रदर्शित झाल्यावर समीक्षकांकडून फारसा पाठिंबा मिळाला नसूनही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय. पहिल्याच वीकएंडला या चित्रपटाने १२.५७ कोटींचा धंदा करत निर्मात्यांची उमेद वाढवली आहे. अभिनेत्रीचे अंगप्रदर्शन आणि भरपूर चुंबनदृश्ये असलेला, 'फक्त वयस्कांसाठी' असलेला 'हेट स्टोरी ४'ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून लेखक-दिग्दर्शक-निर्माते या सर्वांनाच आनंद झाला असणार.