‘चिठ्ठी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत धनश्री काडगावकर

‘चिठ्ठी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत धनश्री काडगावकर

आजवर अनेक टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता 'चिठ्ठी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून येत्या नवीन वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती पण त्यांनीच केली आहे. वैभव काळुराम डांगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. धनश्री काडगावकर आणि शुभंकर एकबोटे ही नवी जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एक तरूण आपल्या प्रेयसीला चिठ्ठी लिहितो, मात्र ती चिठ्ठी तिला मिळतच नाही आणि त्यामुळे काय-काय धमाल उडते हे या चित्रपटाचं कथानक आहे.