सिनेरसिकांसाठी या तारखेला खुले होणार ‘बॉलिवूड थीमपार्क’

सिनेरसिकांसाठी या तारखेला खुले होणार ‘बॉलिवूड थीमपार्क’

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या कर्जत येथील स्टुडिओला आता फिल्म थीम पार्कच रूप द्यायला सुरुवात केली आहे. ५० एकरच्या परिसरात पसरलेला हा नितीन देसाई स्टुडिओ आता ND's Film World (एनडीज फिल्म वर्ल्ड) म्हणून ओळखला जाणार आहे. जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो असे चित्रपट आणि सम्राट अशो, राजा शिवछत्रपती या मालिकांचे सेट्स ही येथे ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर १०५ मीटरच्या भिंतीवर हिंदी आणि मराठी चित्रपटातल विंटेज पोस्टर्स इथे हाताने पेंट करण्यात आले आहे.