रजनीकांत, अक्षयच्या ‘2.0’ च्या प्रदर्शनाच्या तारखेची अखेर घोषणा

रजनीकांत, अक्षयच्या ‘2.0’ च्या प्रदर्शनाच्या तारखेची अखेर घोषणा

मुंबई - रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची भूमिका असलेला बहुप्रतीक्षित '2.0' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर प्रदर्शनाची ताऱीख जाहिर करण्यात आली आहे. पुढील वर्षी २७ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात झळकेल. प्रसिध्द ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही तारीख आपल्या ट्विटरवरुन जाहिर केली आहे. '2.0' या चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर करत आहेत. सुमारे ३५० कोटी रुपयांचे बिग बजेट असलेला हा चित्रपट आहे. अलिकडे दुबईत चित्रपटाचे म्यूझिक लाँच झाले. या समारंभाचा खर्च १५ कोटी रुपये होता. अक्षय कुमार, रजनीकांत, एमी जॅक्सन, सुधांशु पांडे आणि आदिल हुसैन यांसारखे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षयने या सिनेमात एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारली असून, तो खलनायकाची व्यक्तीरेखा साकारत हे. सुपरस्टार रजनिकांत वसीगरन या वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.