आदित्य चोप्राला ईडीचं समन्स

आदित्य चोप्राला ईडीचं समन्स

दिग्दर्शक आदित्य चोप्रा याला सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) समन्स बजावलं आहे. रॉयल्टी घोटाळ्याप्रकरणी चोप्रा याला हे समन्स बजावण्यात आलं असून त्यामुळं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. चोप्रा याच्यासह ईडीने सोनी म्युझिक इंडियाचे उपाध्यक्ष श्रीधर सुब्रमण्यम, युनिव्हर्सल म्युझिकचे देवराज संन्याल यांनाही कोट्यवधी रुपयांच्या रॉयल्टी घोटाळ्याशी संबंधाप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावलं आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हँकोस कंपनीचे प्रतिनिधी येत्या दोन दिवसांत कागदपत्रांसह ईडी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.