यंदा वाचन प्रेरणा दिनाचीच परीक्षा?

यंदा वाचन प्रेरणा दिनाचीच परीक्षा?

मुंबई : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाचन प्रेरणा दिनानिमित्तच्या तयारीचा वेग वाढला आहे. यंदा १५ ऑक्टोबरला रविवार असल्याने शालेय शिक्षण विभागाने १३ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याची सूचना केली असली तरी सध्या मुंबईतील बहुतेक शाळांमध्ये परीक्षा सुरू असल्याने वाचन प्रेरणा दिन साजरा करायचा कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक शाळांमध्ये १४ तारखेला शेवटच्या पेपरनंतर कार्यक्रम घेण्यात येईल, असे काही मुख्याध्यापकांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

‘भारतरत्न’ माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून गेल्या दोन वर्षांपासून साजरा करण्यात येतो. यंदा १५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुटी असल्याने वाचन प्रेरणा दिन १३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्याची सूचना शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, कॉलेजांना करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक शाळांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, सध्या मुंबईतील बहुतेक शाळेत सहामाही परीक्षा सुरू असून अनेकांची परीक्षा १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्यानंतर दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेचे वातावरण असल्याने अनेक शाळांमध्ये थोडक्यात कार्यक्रम केले जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. अनेक शाळांमध्ये तर फक्त एका तासापुरता वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार आहे.

दरवर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘दप्तराविना शाळा’ भरविण्यात येते. मात्र, सध्या परीक्षा असल्याने शाळांनी हा उपक्रम मोजक्याच पध्दतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. तर, परीक्षा सुरू असल्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर हा दिवस साजरा करण्याच्या हालचाली काही शाळांनी