राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठाचे यश

राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठाचे यश

कोल्हापूर: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात येत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम रँकबँडमध्ये स्थान मिळवले. देशातील टॉप १०० विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारती विद्यापीठाने यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून भारती विद्यापीठचा समावेश रँकबँडमध्ये होत आहे.