एक दिवसात आठ तास वापरतात कॉलेज स्टुडंट्स मोबाईल

 एक दिवसात आठ तास वापरतात कॉलेज स्टुडंट्स मोबाईल

भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसाच्या २४ तासांपैकी तब्बल आठ तास मोबाइलवर घालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि आयसीएसएसआरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

स्मार्टफोन डिपेंडन्सी, हेडॉनिझ्म अँड पर्चेस बिहेविअर: इम्प्लिकेशन फॉर डिजीटल इंडिया इनिशिएटीव’ या संशोधन प्रबंधातही माहिती प्रसिद्ध झाली आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील २० केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं निरीक्षण करण्यात आलं. मोबाइलच्या वापरासंदर्भात प्रत्येक विद्यापीठातील २०० विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारण्यात आले. या सर्वेक्षणातील २६ टक्के विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की ते मोबाइलचा वापर प्रामुख्याने बोलण्यासाठी करतात. याशिवाय गुगल सर्च, गेम खेळणे, अॅप्स वापरणे आणि चित्रफिती पाहण्यासाठीही मोबाईलचा वापर विद्यार्थी करतात. 

सर्वेक्षणानुसार १४ टक्के विद्यार्थी मोबाइलचा वापर तीन तास करतात, ६३ टक्के विद्यार्थी चार ते आठ तास करतात तर २३ टक्के विद्यार्थी आठ तासांहूनही अधिक वेळ मोबाइलचा वापर करतात. तसंच दिवसातून १५० वेळा आपला मोबाइल कॉलेजचे विद्यार्थी चेक करत असल्याची ही माहिती उघडकीस आली आहे.