ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्ण किरवले ह्यांची कोल्हापूरमध्ये हत्या

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्ण किरवले ह्यांची कोल्हापूरमध्ये हत्या

कोल्हापूर: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापूरमधील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली आहे. कृष्णा किरवले कोल्हापूर येथील म्हाडा कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. किरवले यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सध्या राजारामपुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीने क्षुल्लक कारणातून किरवलेंची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 डॉ. किरवले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक होते. शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या किरवले यांच्या घरात त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रमुख अशा पदांवर किरवले यांनी काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच ते निवृत्त झाले होते.