बुंदेलखंड बलात्कार प्रकरण: गायत्री प्रजापती यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट दाखल

बुंदेलखंड बलात्कार प्रकरण: गायत्री प्रजापती यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट दाखल

बुंदेलखंड सामूहिक बलात्काराच्या उत्तरप्रदेशचे मंत्री गायत्री प्रजापती पुरते अडकले आहेत. प्रजापती यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट आणि लूक-आउट नोटीस बजावली आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या इतर सहा साथीदारांविरोधातही वारंट बजावण्यात आले आहे. त्यांना शोधण्यासाठी लखनौ, कानपूर, अमेठी या ठिकाणी छापे मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 प्रजापती हे अमेठी येथून समाजवादी पक्षातर्फे निवडून आले होते. यावेळी देखील ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावरुन निवडणूक लढवत आहेत.२०१४ मध्ये तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप आहे. बुंदेलखंड भागातील महिलेनी त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहे. प्रजापती यांचा साथीदार आपल्याकडे आला आणि खाणीमध्ये काम लावून देतो असे त्याने म्हटले. त्यासाठी आपल्यासोबत यावे लागेल असे त्याने महिलेला म्हटले होते. त्यानंतर त्याने तिला प्रजापती यांच्या गौतमपल्ली येथील शासकीय निवासस्थानी नेले. असे तक्रारीमध्ये लिहिले आहे. प्रजापती यांचा पासपोर्ट चार महिन्यासाठी स्थगित करण्यात आला आहे.त्यांचा शोध घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यांना फरार म्हणून घोषित केले आहे.

 उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापलेले असताना प्रजापती यांना मिळालेल्या नोटीसमुळे समाजवादीला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपण चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करू असे म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाला व पोलिसांना हवे ते सर्व सहकार्य करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.