चारीत्र्यावरील संशयाने पत्नीला संपवले

चारीत्र्यावरील संशयाने पत्नीला संपवले

विरार:  विरारमध्ये एका नवविवाहितेला पतीनंच पेटवून दिल्याची घटना घडली. यात ह्या महिलेचा मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला असून सध्या चौकशी चालू आहे.

 विरार पश्चिमेला असणा-या  शुभ-लाभ इमारतीत राहणाऱ्या अपर्णा सांबारेचं अवघ्या महिन्याभरापूर्वी 11 फेब्रुवारीला सागर सांबारेशी लग्न झालं होतं. अपर्णा नेहमी सोशल मीडियावर मित्रांशी चॅटिंग करायची यावरुन त्या दोघांत नेहमी वाद व्हायचा. सागरला तिच्या चारित्र्यावर संशय होता. काल संध्याकाळी सागरनं अपर्णाच्या वडिलांना फोन करुन तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. मात्र, ही हत्या असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला तशी तक्रारही पोलिसात त्यांनी दिली.

 त्यावरुन पोलिसांनी सागर सांबारेला ताब्यात घेतलं. दरम्यान, 28 वर्षीय सागर हा एका खाजगी कंपनीत कामाला असून ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो कामावरून बराच लवकर निघाला होता. त्यामुळे सागरवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले असले तरी अद्याप अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.