भांडुपमध्ये सिसिटीव्ही कॅमेराची मागणी

भांडुपमध्ये सिसिटीव्ही कॅमेराची मागणी 

भांडुपमध्ये काही वर्षांमध्ये विविध भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सर्वत्र सी.सी.टीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भांडुपमधील एल.बी.एस रोड मार्गावरील आर.आर.पेंटस, सोनापूर, मद्रास कॅफे, रेल्वे स्टेशन,शिवाजी तलाव,गाढव नका,मंगतराम पेट्रोल पंप या ठिकाणी सध्या सी.सी.टीव्ही आहेत,परंतु भांडुपसारख्या दाट लोकसंख्या वस्ती असणाऱ्या ठिकाणी २४ सी.सी.टीव्ही कॅमेरे हवेत. 

टेम्बीपाडा , तुलशेतपाडा, रमाबाई नगर, कोकण नगर,भटीपाडा,जयशंकर नगर, जागृत मित्र मंडळ विशेषतः टेम्बीपाडा आणि तुलशेतपाडा येथील पाईपलाइन भागात सी.सी.टीव्ही कॅमेरे असणे अत्यंत आवश्यक्य असून येथे गर्दुल्ले ,चरसी मुलांचे मोठे टोळके सतत फिरत असतात. गेल्या २ महिन्यात अश्या टोळक्यांमधील भांडणात पाच जणांचा खून झाला आहे. रस्त्याने जाणाऱ्यांचे मंगळसूत्र,सोन्याची चेन,पाकीट मारणे मारण्याचे प्रकार सतत सुरूच आहेत. भांडुपमध्ये काही टोळक्यांमध्ये भांडणे सुरु असल्याने भांडणे,[प्राणघातक हल्ले, अवजारे घेऊन फिरण्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून    बिट मार्शल फिरत ठेवून परिस्थिती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यावीसही भांडुपकर असणारे अविनाश विश्वकर्मा यांनी गृहविभाग, परिमंडळ ७ चे आयुक्त,वाहतूक विभाग,भांडुप पोलीस ठाणे,खासदार किरीट सोमैया यासर्वांना पत्रव्यवहार केला असून कोणतीही हालचाल केले नसल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले. सी.सी.टीव्ही च्या निगराणीने या गोष्टींना निश्चितच आळा बसेल असे नागरिकांचे मागणे आहे