कर्णधार कोहलीची पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी

कर्णधार कोहलीची पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली - भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी जरी अनिर्णित राहिली असली तरी भारताने ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने हा पराक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाने हा विक्रम ऑक्टोबर २००५ ते जून २००८ मध्ये केला होता. जुलै २०१५ मध्ये जेव्हा श्रीलंका संघाने भारताचा दौरा केला तेव्हापासून भारतीय संघ कसोटी मालिकेत अपराजित राहिला आहे. या काळात भारताने ३ वेळा श्रीलंका संघाला तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्टइंडिज, इंग्लंड, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रत्येकी एक वेळा हरवले आहे.भारताच्या या ९ कसोटी मालिकेंच्या विजयात भारताकडून सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने ठोकल्या. कोहलीने १० शतकांच्या मदतीने २ हजार ७०७ धावा केल्या आहे. ऑस्ट्रेलियाने जेव्हा सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या होत्या त्याही वेळी रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने या ९ कसोटी मालिका विजयात १२ शतकांच्या मदतीने २ हजार ७९० धावा केल्या होत्या.