के.एल.राहुलने मोडीत काढले दिग्गजांचे विक्रम

के.एल.राहुलने मोडीत काढले दिग्गजांचे विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात के.एल.राहुल ने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धाशाताकाबरोबरच त्याने आपल्या नावावर एक विक्रमाच करून घेतला. त्याचे कसोटी सामन्यातील एक-दोन नाहीतर तब्बल सातवे सलग अर्धशतक ठरले आहे. त्याने या अर्धशतक सोबातच दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहे. राहुलच्या अर्धशताकांची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळूर कसोटी पासून सुरु झाली. भारताकडून सलग ७ अर्धशतक ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे. गुंडाप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी ६ अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. के.एल.राहुलने दोघांचाही विक्रम मोडीत काढला.