KXIP vs CSK: पंजाबचा चेन्नईवर रोमहर्षक विजय

KXIP vs CSK: पंजाबचा चेन्नईवर रोमहर्षक विजय

किंग्ज इलेव्हन पंजाबनं रोमहर्षक लढतीत चेन्नई सुपर किंग्जवर अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाबाद ७९ धावांची तडाखेबंद खेळी केली. पण चेन्नईला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अखेरच्या षटकांत चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. धोनी मैदानात असूनही १३ धावाच करता आल्या. 

पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १९७ धावा केल्या. चेन्नईला २० षटकांमध्ये ५ बाद १९३ धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून टायनं दोन गडी बाद केले. मोहीत शर्मा आणि अश्विननं प्रत्येकी १ गडी बाद केला. धोनीनं या लढतीत सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्यानं सहा चौकार आणि पाच षटकार खेचले. धोनीशिवाय चेन्नईकडून अंबाती रायडूनं चांगली फलंदाजी केली. केवळ एका धावेनं त्याचं अर्धशतक हुकलं. तर पंजाबकडून ख्रिस गेलनं तडाखेबंद अर्धशतक ठोकलं