द्रविडच्या मुलाचे वडिलांना वाढदिवसाचे अनोखे ‘गिफ्ट

द्रविडच्या मुलाचे वडिलांना वाढदिवसाचे अनोखे ‘गिफ्ट

बंगळुरू - भारताचा माजी कर्णधार तसेच भारताच्या अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा आज वाढदिवस आहे. द्रविडच्या वाढदिवसाला त्याचा मुलगा समित याने वडिलांना खास गिफ्ट दिले आहे. राज्य संघटनेतर्फे १४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये समितने मल्या आदिती आंतरराष्ट्रीय प्रशालेकडून खेळताना १५० धावा ठोकल्या. त्याच्या याखेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडिलांच्या वाढदिवसाच्या एका दिवसाआधी दीडशतक झळकावत समितने आपल्या वडिलांना एकाप्रकारे वाढदिवसाचे गिफ्ट दिले. समितसोबतच माजी कसोटी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांचा मुलगा आर्यननेही १५४ धावांची खेळी या सामन्यात केली. आर्यन आणि समितने मोठी भागिदारी रचली. त्यामुळे त्यांच्या संघाला ५० षटकांमध्ये ५ बाद ५०० असा धावांचा डोंगर रचता आला. याला उत्तर देताना प्रतिस्पर्धी असलेल्या विवेकानंद प्रशालेचा संघ ८८ धावांवर गारद झाला.