तीस-या दिवसाअंती भारताकडे १२६ धावांची आघाडी

तीस-या दिवसाअंती भारताकडे १२६ धावांची आघाडी

बंगळुरु: चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या अप्रतिम भागिदारीनं बंगळुरू कसोटीत टीम इंडियावरचा तणाव किंचित हलका झाला. भारताकडे सध्या 126 धावांची आघाडी आहे. पण ही कसोटी रंगतदार करण्यासाठी भारताला अजूनही धावांची रास उभी करण्याची गरज आहे. तसेच, या कसोटीत टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद 213 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात घेतलेली 87 धावांची आघाडी लक्षात घेता भारताला चौथ्या दिवशी आणखी धावांचा डोंगर रचावा लागणार आहे. 


 बंगळुरु कसोटीत झुंजार फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 276 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 87 धावांची आघाडी आहे. भारताकडून सर्वाधिक फिरकीपटू रवींद्र जाडेजानं 6 बळी घेतले. दरम्यान, भारतानं दुसऱ्या डावाला हळू सुरुवात केली आहे. लंचपर्यंत भारतानं एकही गडी न गमावता 38 धावा केल्या आहेत.  


 दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी मॅथ्यू वेड 25, तर मिचेल स्टार्क 14 धावांवर खेळत होता. भारताच्या चारही गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी टिच्चून मारा केला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला दिवसभराच्या खेळात सहा विकेट्स गमावून केवळ 197 धावाच जमवता आल्या. त्यात मॅट रेनशॉ आणि शॉन मार्शच्या झुंजार अर्धशतकांचा बहुमूल्य वाटा होता.