एसबीआयच्या ग्राहकांना दिलासा, निर्धारित रकमेवरील दंडाच्या शुल्कात कपात

एसबीआयच्या ग्राहकांना दिलासा, निर्धारित रकमेवरील दंडाच्या शुल्कात कपात

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. बचत खात्यांवर महिन्याला सरासरी निर्धारित रक्कम जमा नसल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये एसबीआयने ७० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या दंडाच्या शुल्कात कपात केल्याच्या फायदा एसबीआयच्या तब्बल २५ कोटी ग्राहकांना होणार आहे. या  नवीन शुल्काची आकारणी येत्या १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. बचत खात्यांमध्ये सरासरी रक्कम शिल्लक न ठेवल्यास शहरी भागात ५० रुपये दंड आकारला जात होता. या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली असून आता नव्या नियमानुसार हा दंड १५ रुपये करण्यात आला आहे.